Shubhchintak
शुभचिंतक आपण मोठं व्हावं शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध व्हावं आणि उच्च शिक्षण घ्यावं ही तळमळ प्रत्येकाच्या मनामध्ये असते अशावेळी काही आर्थिक संकट आले की प्रत्येक व्यक्तीला आपल्या अंगभूत गुणांचा आणि गुणवत्तेचा विचार न करता प्राप्त परिस्थितीला सामोरे जावं लागतं स्वातंत्र्य मिळाले असले तरी आजही समाजाचा काही दुर्लक्षित भाग असा आहे की आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते अशांसाठी व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या गरजू युवा युवतींना त्यांच्या प्रथम वर्षापासून अंतिम वर्षापर्यंत शिष्यवृत्ती शिष्यवृत्तीच्या स्वरूपात शुभचिंतक योजनेमार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते.