sarvjanik wachnalay
बाल जगत सुरू झालं आणि लहान मुलांच्या सोबत मोठ्यांसाठी पण काहीतरी करावं या उद्देशाने वाचनालयाची कल्पना अस्तित्वात आली आणि सार्वजनिक वाचनालय सुरू झालं याला मिळालेला प्रतिसाद इतका चांगला होता की सर्व वाचनालया अंतर्गत विविध स्पर्धा वाचन विषयीच्या स्पर्धा घेतल्या जाऊ लागल्या. सुरुवातीला अगदी अल्प प्रमाणात असलेल्या वाचनालय लक्ष्मी नगर मध्ये प्रसिद्ध झालं आणि वाचनालयाची संख्या वाढू लागली त्यासोबत सोबत आपला वेळ देऊ इच्छिणाऱ्या काही जेष्ठ महिलांचाही याच्यामध्ये सहभाग फार मोलाचा होता. या वाचनालयामध्ये अद्यावत पुस्तक मासिक साप्ताहिक पाक्षिक असं सर्व काही प्रकारचे साहित्य होतं. याशिवाय बाल वाचनालय सुद्धा याच्या अंतर्गत सर्व लोकांसाठी सुरू करण्यात आलं. या अंतर्गत लहान मुलांसाठी वाचन स्पर्धा कथाकथन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा देखील वाचनालयाने पुष्कळ काळपर्यंत चालवल्या मोठमोठे वक्ते आपल्या इथे या निमित्ताने बाल जगतला भेट देऊन गेले होते. प्रख्यात लेखिका सामाजिक मान्यताप्राप्त व्यक्ती याही लोकांचा आपल्याला याही लोक आपल्याला सार्वजनिक वाचना वाचनालयामुळे सहवास लाभलेला आहे.