Gopalnagar Balwadi
गोपाल नगर बालवाडी हा एक दीनदयाल शोधसंस्थान बालजगतच्या अंतर्गत चालणारा यशस्वी उपक्रम आहे. ही बालवाडी गेल्या 30-35 वर्षांपासून विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करीत आहे. गोपाल नगर वस्तीमध्ये असलेल्या या शाळेत तीन ते चार वर्षापर्यंतच्या मुलांचा प्रवेश असतो. या शाळेमध्ये शालेय शिक्षणासोबत मुलांनी समाजात कसं वागावं याविषयीचे पण संस्कार शाळेमार्फत दिल्या जातात. हाच उद्देश साधारणतः या शाळेद्वारे पूर्ण होतो आहे. शाळेतील शिक्षिका सक्षम असून मुलांना आईच्या मायेने शिकविणाऱ्या आहेत. शाळेमधून शिकलेल्या मुलांना पुढील शिक्षणासाठी नागपुरातील प्रतिष्ठित शाळांमध्ये सहजगत्या प्रवेश मिळतो .अगदी सुरुवातीचे विद्यार्थी उच्चशिक्षित असून सरकारी, काही निम सरकारी सेवेमध्ये कार्यरत आहेत . याशिवाय काही डॉक्टर्स ,इंजिनियर्स होऊन परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेले ,आणि तिथून शिकून आलेले असेही विद्यार्थी या शाळांमध्ये तयार झालेले आहेत. दिवसागणिक शाळेमधील मुलांची संख्या ही वाढत्या प्रमाणात आहे आणि आजही वस्तीतली शाळा ,बालवाडी एक मुलांसाठी, उत्तम नागरिक होण्यासाठी, सक्षम व्यासपीठ आहे.