उन्हाळी शिबिर हा एक स्वतंत्र विषय आहे जुलै ते मार्च या दिवसांमध्ये ज्या मुलांना बाल जगत मध्ये येता येत नाही. त्यांच्यासाठी एप्रिल मे जून हे तीन महिने ग्रीष्म कालीन शिबिरासाठी आयोजित करण्यात येते. या शिबिरांमध्ये दोन ते चार वर्षाच्या मुलांसाठी शिशुरंजन चार ते दहा वर्षाच्या मुलांसाठी बालरंजन आणि दहाच्या वरच्या मुलांसाठी ज्ञानरंजन या तीन मासिक शिबिरांचे आयोजन विशेषत्वाने करण्यात आले. याव्यतिरिक्त सुलेखन हस्ताक्षर, बांबू कला, चित्रकला, लोकगीत, लोकनृत्य, मेहंदी, इंग्लिश स्पिकिंग, संस्कृत पाठांतर ते अनेक असे शिबिर जवळपास 40 ते 45 शिबिर या तीन महिन्यांमध्ये घेण्यात येतात. यावेळी बालकाचा परिसर हा मुलांनी मुलांनी आणि पालकांनी भरगच्च असा असतो. या शिबीरांना सुद्धा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. विविध स्पर्धा विविध स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा अनेक स्पर्धा घेतल्या जातात. यामध्ये मुलांच्या बरोबरीने सुद्धा पालकांचे सहकार्य असते. शिशुरंजन मधील बाहुलीचे लग्न अतिशय आवडीचे आहे खऱ्या खऱ्या लग्नासारखी याची तयारी संयोजिका आणि पालक करतात. या भावला भावली च्या लग्नाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो.
Baljagat unhali satra shibir
