Baljagat

Baljagat Matrudin

मातृदिन आपल्या देशाला आपण भारत माता म्हणतो जगातला कोणता देश आपल्या देशाला माता म्हणत नाही मात्र भूमी म्हणत नाही मातृभाव हा आपला श्वास आहे देशमाता स्वमाता असा संस्कार मनात रुजवण्यासाठी मातृदिन साजरा केला जातो. पहिल्या प्रथम कार्यक्रमाला माननीय साधनाताई आमटे उपस्थित होत्या. याही कार्यक्रमाच्या अंतर्गत बऱ्याच मान्यवरांच्या व्यक्तिमत्त्वांच्या भेटी बालजगतला झालेल्या आहे. या दिवशी मुलं आपल्या आईचे पाय धुतात आणि तिला आपला श्रद्धा भाव अर्पण करतात हा एक संस्कार बालजगत मार्फत आज कित्येक वर्षापासून मुलांच्या मनावरती बिंबवल्या जातो आहे आज मातृदिन हा कार्यक्रम सुद्धा आजी आजोबा दिवसांसारखाच नागपूर आज सर्वत्र साजरा केला जातो पण पहिल्या प्रथम हा दिवस साजरा करण्याची कल्पना ही बालगतचीच होती.