बाल जगत जलतरण
बाल जगत चे जलतरण सुरू झाले यावर्षी जवळपास 30 32 वर्ष होतात. पाच वर्षापासून च्या मुलांना ते 14 वर्षे पर्यंत जलतरण शिकविल्या जात असे. यासाठी तज्ञ प्रशिक्षक तज्ञ सुरक्षा रक्षक यांचा कटाक्षाने विचार करून उपयोग होत असे इतक्या लहान मुलांना जलतरण शिकवणे अतिशय कठीण आणि आव्हानात्मक होते मात्र ते आवाहन बाल जगत सहज पेलले. आत्तापर्यंत हजाराच्या वरती मुलं जलतरण शिकलेले आहेत. त्यातील काही तर आता कोच म्हणून इथे शिकवायला येतात. इथल्या पाण्याची शुद्धता 24 तास फिल्टर सक्षम मशीन याच्यावरती 100% आधारित आहे.