Baljagat आजी आजोबा दिवस
बाल जगत अंतर्गत असेच विविध कार्यक्रम नव्याने ओळख करून देण्यात आले जसं की आजी-आजोबा दिवस ताईंचा वाढदिवस म्हणजे 24 डिसेंबर हा दिवस आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले. या दिवशी मुलांच्या आजी-आजोबांना आमंत्रित केल्या जात असे त्यांच्यासाठी विविध स्पर्धा काही मैदानी खेळ काही बौद्धिक खेळ असं ठेवून एक दोन तासाचा पूर्ण कार्यक्रम त्यांच्यासाठी असे या कार्यक्रमाला अतिशय सुंदर असा प्रतिसाद मिळाला या दिवशी फक्त मुलांचे आजी आजोबा बाल जगातला येतात आणि मुलांच्या सोबत लहान होऊन खेळतात यावेळी स्पर्धक आजी-आजोबा असतात आणि प्रेक्षक हे लहान मुलं असतात अतिशय सुंदर हा कार्यक्रम आज नागपुरात जागोजागी शाळांमध्ये विविध संस्थांमध्ये राबविण्यात येतो पण हा सुरुवातीला आपल्या बाल जगत मध्येच केल्या गेलेला आहे.