Baljagat

Bal Jagat

दीनदयाल शोध संस्थान च्या विविध उपक्रमातील मुलांसाठीचा एक  अभिनव प्रयोगशील उपक्रम म्हणजे बालजगत होय. लहान मूल ही देशाची प्रगत आणि उत्तम धरोहर आहे देशाला एक सुघड नागरिक देणे आणि संरक्षित करणे ही काळाची गरज आहे आजच्या यंत्र युगात केवळ शिक्षण महत्त्वाचं नाही तर समतल भेदभाव रहित विचारसरणीची प्रजा घडविणे हा प्रमुख उद्देश दीनदयाल शोध संस्थांच्या बालजगत घडणी मागचा होता अतिशय विचारपूर्वक यामागील प्रेरणेचे संयोजन माननीय नानाजी देशमुख यांचे होते आणि तशीच साथ माननीय ताई सुकळीकरांनी त्यांना दिली आज बालजगतची पाळं हार खोलवर उरलेली आहे पाच ते 14 वर्ष ही मुलांच्या आयुष्यातील अधिक संस्कारक्षम भावनाशील असतात या वयात केलेले संस्कार हे पुढे आयुष्यभर उपयोगी पडतात हेच लक्षात घेऊन बाल जगत चा काम सुरू झाले. समाजाच्या सर्व स्तराची मुलं हे एकोप्याने राहावी यासाठी बाल जगत मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. ताईंनी साठी नंतरचे पूर्ण आयुष्य बालजगतच्या वाढीकरता समर्पित केले त्यांचा लोकसंग्रह दांडगा होता. चहू बाजूनी मदतीचा सहकार्याचा ओघ सुरू झाला आणि बालजगत आकाराला येऊ लागले. मंडपम बांधल्या गेली रंगमंच बांधला गेला. फाउंटन टेकडी त्यावर शिवशंकराची मूर्ती स्थापित झाली. यामागे कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत एक निरंतर ध्यास आणि अहोरात्र चिंतन यातूनच 11 फेब्रुवारी 1991 ला बाल जगाचा शुभारंभ झाला. उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान माननीय श्री चंद्रशेखरजी यांच्या हस्ते झाले. त्यावेळेस ते बालजगत आजही डोळ्यासमोर उभे राहते. सर्वत्र फुलांची सजावट आकर्षक रंगवल्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील कर्तव्य पुरतीचा आनंद अनेक वेगळा नवीनतम आवाहन पेलणार याचा स्वाभिमान होता. लोकांच्या मनात बालजगत काय आहे याविषयी अपार कुतुहल होते. शाळेव्यतिरिक्त आणखीन बालजगत काय देणार त्यामागचा उद्देश काय याविषयी सर्वत्र उत्कंठा होती बालजगतच्या उभारणीत जसे कार्यकर्त्यांचे योगदान होते तसेच दानशुरांच्या रूपाने आर्थिक मदत पण होत होती आपण नदीतलं पाणी जसं सूर्याला अर्ध देतो पण ते पाणी नदीला समर्पित होते त्याचप्रमाणे समाजाकडून मिळालेला पैसा पुन्हा समाजाच्या कामासाठीच म्हणजे बालजगतच्या उभारणीसाठी खर्च होत होता अनेकांचे सहकार्य तन-मन-धनाने घेऊन बाल जगत आकारला येत गेले. पाच जुलै 1991 ला खऱ्या अर्थानं चार ते सहा या वेळात बालजगत सुरू झालं. जवळपास बाराशे ते चौदाशे प्रवेश अर्ज आलेले होते. त्यातून मुलांची निवड केल्या गेली. निवड प्रक्रिया अतिशय काटेकोर होती मुलाखती बौद्धिक  मानसिक  पालकांच्या मुलाखती अशा सगळ्या कसोट्या लावून मुलांचा प्रवेश घेतला होता. 250 मुलांचा प्रवेश झाला यामध्ये सर्व आर्थिक स्तरातील मुलं मुली देखील होते. जवळपास 12 ते 13 संयोजका होत्या व याप्रमाणे मुलांचे गट करून प्रत्येक संयोजकेकडे 10-15 मुलं देण्यात आली गटांना फुलांची आकर्षक नाव देण्यात आली होती. यामागील उद्देश आता हळूहळू लोकांच्याही लक्षात यायला लागला. चार ते 14 हे संस्कारक्षम वय असतं मुलांची मन टिप कागदासारखी असतात. सोबतच निरीक्षण करून हवं ते घेण्याचे वय दोन तास बालजगत मध्ये शारीरिक बौद्धिक मानसिक दृष्ट्या त्यांचा विकास साधून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देत विविध कला लक्ष्मी नगरच्या परिसरात बालदगच्या मार्फत शिकवल्या जाऊ लागल्या.

समाजातील विविध स्तरातील 250 मुलांचा प्रवेश होऊन सहा जुलैला बालजगत सुरू झाले. आपल्या सणांविषयी दिनविशेष याविषयीची माहिती त्यांना व्हावी या दृष्टीने विविध कार्यक्रम आखल्या जाऊ लागले. वाणी स्पष्ट शुद्ध असावी स्मरणशक्ती वाढावी यासाठी श्लोक पाठांतर स्तोत्रपठण यासोबत इतिहासातील महापुरुषांची ओळख व्हावी आणि हे सर्व   गप्पागोष्टींच्या रूपात मुलांच्या समोर भाव म्हणून दोन तासातील 25 ते 30 मिनिटे संस्कार वर्ग सुरू करावा हा विचार प्रत्यक्षात आला यामध्ये मुलांची मोकळेपणाचा संवाद आणि आपले सणवार त्या पाठच्या कथा त्यावेळी घडणारे प्रसंग पदार्थांचा महिमा या सर्व विषयी मुलांना माहिती दिल्या जाऊ लागली. मुलांच्या निकोप वाढीकडे सर्वांचे लक्ष असायचे. सामाजिक जागरूकता याविषयी सतर्कता दाखवणे गरजेचे आहे हा संस्कार कृतीतून मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असे. त्या प्रमाणात कार्यक्रमाचे स्वरूप पूर्ण तया स्वतंत्र होते यामध्ये चित्रपट विरहित गाणी नृत्य नाटिका लोकदृत्य एखाद्या महापुरुषाच्या जीवनावरील प्रसंग अशा प्रकारचे कार्यक्रम स्वतः संयोजिका लिहीत असत मुलांकडून बसवून घेत असत म्हणूनच की काय बालजगत स्नेहसंमेलन नेहमीच हटके आणि आकर्षित राहिलेले आहे. नागपंचमी, राखी पौर्णिमा, गणपती, दिवाळी वेगवेगळ्या पद्धतीने सादर होत असे राखी पौर्णिमेला दोन-तीन दिवस अगोदरपासून मुलांना राख्या कशा तयार करायच्या हे शिकवल्या जात होते. तयार झालेल्या राख्या कधी अंधे विद्यालय कधी पोलीस स्टेशन कधी दवाखाने तर कधी सीमेवर लढणाऱ्या जवानांना मुलांमार्फत पाठवल्या जात असे. याही उपक्रमाचे सर्व ठिकाणाहून कौतुक झालेले आहे. दिवाळीच्या अगोदर किल्ले  बनवल्या जात असत. यामध्ये मुलांचा मातीशी संपर्क येत असेल येत असे आणि एक प्रकारचं नातं त्यांच्या त्यांचं मातीशी जोडल्या जात होतं किल्ले तयार झाल्यावर त्यावर कधी गहू पेरल्या जाऊन कधी मोहरी पेरल्या जाऊन धणे पेरल्या जाऊन मुलांना शेती कशी होते कोणचं पीक किती दिवसात येतो याविषयीची माहिती नकळत होत असे. दिवाळीच्या आधी एक दिवस किल्ले प्रदर्शनी त्यांच्यासोबत आनंद मेळा असा एक कार्यक्रम बाल जगत मध्ये पालक आणि मुलं आणि सर्व कार्यकर्ते यांच्यासोबत साजरा केल्या जात असे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *