Baljagat

About Us

About Us

दीनदयाल शोध संस्थान च्या विविध उपक्रमातील मुलांसाठीचा एक उप अभिनव प्रयोगशील उपक्रम म्हणजे बाल जगत होय याची सुरुवात रामदास पेठ येथील काचीपुरा बगीचा झाली तिथे लावलेली रोपटे आज लक्ष्मी नगर सारख्या मध्यवर्ती वस्तीमध्ये एका मोठ्या विशाल वटवृक्षात रूपांतरित झालेले आहे ताईंच्या साठाव्यापूर्तीच्या कार्यक्रमात बाल जगतची मुहूर्तमेढ रोवल्या गेली.

माननीय अनुताई भागवत श्री बाळासाहेब देवरस माननीय नानाजींचा आशीर्वाद घेऊन ताईंनी वयाच्या साठ नंतर समाजासाठी काही देण्याच्या दृष्टिकोनातून बाल जगत साकारले ताईंचा लोकसंग्रह दांडगा होता बोलण्यात आपलेपणा या सगळ्याचा परिपाक म्हणून बाल जगतच्या उभारणीला तन-मन-धनाने मदत मिळत गेली तशी कोणतीही सरकारी मदत नव्हती लक्ष्मी नगर मधील एक भूखंड बाल जगतच्या साठी सर्वानुमते निवडल्या गेला ते सायंटिफिक सोसायटीची जागा मिळायला दोन ते तीन वर्षाचा कालावधी गेला आणि कामकाज सुरू झाले बाल जगत आकारला येऊ लागले हा बाळजगतचा शारीरिक भाग झाला बाल जगतची मानसिकता ज्याला आपण आत्मा म्हणू शकतो तो म्हणजे बाल जगत चा उद्देश काय त्याच्या निर्मिती मागची संकल्पना काय हे सर्व आधी कार्यकर्त्यांना समजावे यासाठी बैठका होत गेल्या आणि धूसर असणारे चित्र काही प्रमाणात कार्यकर्त्यांच्या मनात स्पष्ट होत गेले.

लहान मुलं ही देशाची प्रगत आणि उत्तम धरोहर आहे देशाला एक सुघड नागरिक देणे आणि देशाला संरक्षित करणं. आजच्या यंत्र युगात केवळ शिक्षण महत्त्वाचं नाही ,तर समाजाला भेदभाव रहित विचारसरणीची प्रजा घडविणे हा प्रमुख उद्देश दीनदयाल संस्थांनच्या बाल जगत घडणीच्या मागचा होता. अतिशय विचारपूर्वक यामागील प्रेरणेचे संयोजन माननीय नानाजी देशमुख यांचे होते. त्यांना तशीच साथ माननीय ताई सुकळीकरांनी दिली. आजच्या बाल जगतची पाळमुळं फार खोलवर रुजलेली आहेत 1980 च्या काळात रामदास पेठ येथील  पार्कात याची सुरुवात झाली. आजूबाजूची लहान मुलं अगदी सगळ्या स्तरातील एकत्र येत असत. त्यांच्यासोबत त्यांच्या आया पण येत.  मुलांना खेळ गाणी गोष्टी शिकवल्या जात असे. त्या ठिकाणी एक मोठं पाण्याचं टाकं होतं त्याच्यात मुलांना पोहणे सुद्धा शिकविल्या जात असे. असं म्हणता येईल कदाचित बाल जगतची सुरुवातच तिथून झाली आहे.